पंढरपूर प्रतिनिधी
ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर आयोजित जागतिक पशुवैद्यक दिन स्वारी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने तो साजरा करण्यात आला. जीवनगौरव पुरस्कार वितरण व लम्पी योद्धा सन्मानपत्र वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त स्वेरीमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात सविता दूधभाते यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण व लम्पी योद्धा सन्मानपत्र देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतल मुकणे, पंढरपूर मधील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे, सह आयुक्त डॉ.संतोष पंचपोर, माजी सहायक आयुक्त डॉ.अरविंद देशपांडे, सहाय्यक आयुक्त डॉ.दिनकर बोर्डे, डॉ.महेश बनसोडे, डॉ. भास्कर पराडे व इतर. डॉ.अरविंद देशपांडे यांना स्व.डॉ सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार डॉ शीतल मुकणे अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते देताना. सोबत डॉ. संतोष पंचपोर, डॉ.महेश बनसोडे, स्टेज वर डॉ.विश्वासराव मोरे,डॉ.बोर्डे, डॉ. परिहार, डॉ.सरदेशमुख, डॉ. पराडे,डॉ.भिंगारे व इतर अधिकारी उपस्थित होते.