पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चैत्री यात्रेनिमित्त आणि कक्षाचे ठाणे येथील प्रमुख राम राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांसाठी व पंढरपूर मधील स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १५०० हून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अशी माहिती शिबिराच्या आयोजक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूरच्या तालुका समन्वयक मनिषा वासकर यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदक्षिणा रस्त्यावरील श्री कालिकादेवी मंदिराजवळील वासकर वाड्यात आयोजित केलेल्या या शिबीराचे उदघाटन पंढरपूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सतीश मुळे, एेश्वर्या मुळे तसेच महंत मोहनदास यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, टाकळी ग्रामपंचायतीच्या सदस्या रोहिणी साठे, डाॅ.अमित पावले, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, भारत नागणे, विरेंद्र उत्पात आदी उपस्थित होते.
सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान झालेल्या या शिबिरात सुमारे पंधराशेहून अधिक लोकांच्या ईसीजी, शुगर, रक्त तपासणी, रक्तगट, रक्तदाब आदि तपासण्या करण्यात आल्या. नेत्रतपासणी शिबिरात सातशे रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेखा चंद्रराव यांनी केले. या कार्यक्रमास लाईफ लाईन हाॅस्पिटल, गॅलेक्सी हाॅस्पिटल, अक्षय ब्लड बॅंक, लायन्स क्लब सोलापूर, डाॅ.अमोल कवाळे, विठ्ठल राहीरकर, प्रांजली उत्पात, ऋतुराज रोपळकर , विठ्ठल कंगुणे यांचे सहकार्य मिळाले.