ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
नाशिक जिल्हयातील लाखो रुपयाची उलाढाल असणार्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागासाठीची निवडणुक उदया होत आहे. सदरची निवडणुक कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशीच दोन गटात रंगताना दिसत असुन गेली पाच दशके गुळवे बाप लेकाचें या बाजार समितीवर वर्चस्व कायम आहे. यंदा गुळवे हे आपले वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवतात कि गुळवेचें वर्चस्व मोडीत काढत गुळवे विरोधी कांग्रेस चा दुसरा गट परिवर्तन घडवणार काय याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.
घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती व गुळवे हे समीकरण गेली पाच दशके अबाधीत आहे. स्व.गोपाळराव गुळवे यांनी तब्बल चार दशके या बाजार समितीवर वर्चस्व राखले होते. त्यांचे पश्चात् एड.संदिप गुळवे यांनीही बाजार समिती वर एकहाती वर्चस्व कायम ठेवले होते.
यावेळी एड.गुळवे यांनी भल्या भल्याचें अंदाज मोडित काढत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांना सामावुन घेत समावेशक पैनल बनवले आहे. कांग्रेस, रा.कांग्रेस, शिवसेनेचा उ.बा.ठा.गट आदिसह चक्क भाजपही एड.गुळवे सोबत दिसत आहे.त्यामुळे एड.गुळवे यांचे पैनल आजतरी जड भरतानांच दिसत आहे.या शिवाय सहकारावर एड.गुळवेचीं आजही पक्की मांड आहे.
एड.गुळवे सोबत माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, शिवसेनेचे निवृत्ती जाधव, म.वि.प्र.माजी संचालक भाऊसाहेब खातळे, भाजपचे नंदु पा गाढवे आदि दिग्गज नेते आहेत.
दुसरीकडे वर्षानुवर्षं असलेल्या एड.गुळवेच्यां सहकारातील सत्तेला सुरुंग लावण्याच्या ईरादयाने शिवसेना शिंदे गट, कांग्रेस चा गुळवे विरोधी गट, रा.कांग्रेस चा एक गट सरसावला आहे.
कै.गुळवेचें पट्टशिष्य तथा घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती संपतराव काळे, माजी जि.प.सदस्य उदय जाधव, कांग्रेस गुळवे विरोधी गटाचे भास्कर गुंजाळ, जनार्दन माळी, पांडुरंग शिंदे आदी मातब्बर मंडळी परिवर्तनासाठी सज्ज झालेली आहेत.
या शिवाय शेतकरी कामगार पक्ष व अन्य विचाराचेंही एक पैनल या निवडणुकीत उतरलेले आहे.
दरम्यान उदया या अठरा जागासाठी चुरशीचे मतदान होत आहे. यात मतदार प्रस्थापितांना पुन्हा एकदा कायम ठेवतात कि परिवर्तन घडवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
*मतदाराचें पर्यटन,एका मताची किंमत वाढली ?*
यंदा बाजार समितीची निवडणुक चांगलीच चुरशीची सुरु आहे. गुळवे विरुद्ध गुळवे विरोधक असा चुरशीचा सामना आहे. या चुरशीच्या लढाईत मतदाराचीं मात्र चंगळ सुरु आहे. शेकडयाने मतदार असल्याने आपल्या आपल्या विजयासाठी नेत्यानीं समर्थक मतदार पर्यटनाच्या नावाखाली सहलीला नेले आहे.येथे देवदर्शनासह खाण्या पिण्याचीही चांगलीच चंगळ सुरु आहे.
दरम्यान यंदा एकेका मताचे मुल्य ही वाढले असुन किमान पंधरा हजार रुपये असा मताचा दर असल्याची खमंग चर्चा आहे.
*कांग्रेस - राष्ट्रवादीतील संघर्ष चव्हाटयावर?*
सहकारात खरेतर पक्षाला फारसा अर्थ नसतो असे असले तरी घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीच्या निमित्ताने पडलेले गट तट पाहता कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस मधील चर्चित गटबाजी पुन्हा प्रकर्षांने चव्हाटयावर आली आहे.
कांग्रेस मध्ये एड.संदिप गुळवे समर्थक गट व विरोधी गट असे दोन गट पडले आहे. तर राष्ट्रवादी कांग्रेस चे दोन दिग्गज नेते उदय जाधव व गोरख बोडके यांनी परस्परविरोधी भुमिका घेतल्याने पक्षातील धुसफुस चव्हाटयावर आली आहे.
राज्यात सगळीकडे महा विकास आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप युती अशा बहुसंख्यक लढती होत आहे.
ईगतपुरी तालुक्यातील चित्र मात्र वेगळे आहे. इथे महा विकास आघाडी मधील प्रमुख पक्षातच तीव्र गटबाजी आहे.दुसरीकडे भाजप चक्क महा विकास आघाडी काही घटकासोबत आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट ही रा.का.व कांग्रेस च्या एका गटासोबत आहे.