पंढरपूर प्रतिनिधी
विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपली शाळा व महाविद्यालयातील आठवणी नेहमी त्यांच्या मनात घर करून रहात असतात. याचा प्रत्यय एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आला. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. राजेंद्र पाटील, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. नामदेव सांवत, प्रा. अनिल निकम, प्रा. शिवाजी पवार, विद्यार्थी प्रतिनिधी प्रज्ञा पवार, सौरभ व्होनमाने आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी त्यानिमित्त परत एकदा एकञ आले. विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनातील आठवणीत हारवून गेले होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे म्हणाले, महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीस माजी विद्यार्थ्यांचे स्थान महाविद्यालयातील महत्वपूर्ण आहे. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वेगळ्या क्षेञात काम करीत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले असल्याचे डाॅ. कैलाश करांडे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी संबोधित केले.
सिंहगड कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर याबद्दल कौतुक करून महाविद्यालयाने दिलेल्या ज्ञान व संस्काराच्या जोरावरच आज आम्ही चागंल्या कंपनीत काम करत असल्यची भावनि यादरम्यान व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाकडून माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अमोल नवले, गणेश नवले-माळी, प्रभाकर शिंदे, सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयोग चिकलकर व आर्या आराध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. समीर कटेकर यांनी मानले.