संग्रहित छायाचित्र
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रविवारी असलेल्या बाजारातून MH-13BL-9349..HF..Deluxe या कंपनीची मोटरसायकल चोरीस गेलेली आहे.
रविवारी या गावचा बाजार असतो या बाजारात अकलूज पंढरपूर मोहोळ आदि ठिकाणहून व्यापारी येतात त्याचबरोबर येथील जवळपासच्या खेडेगावातूनही खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होते या गर्दीचा फायदा चोरटे घेताना दिसून येत आहे. यापूर्वी अनेक वेळा बाजारातून मोबाईलच्या चोरीची प्रकरणे घडलेली आहेत. तसेच मोटरसायकल ही चोरीस जाण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
त्यामुळे पोलिसांनी रविवारी ही आपली गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.