सोलापूर प्रतिनिधी
पूर्व भागातील कुचन नगर येथे श्री सुशीला मठात श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाने भक्ती सागर या कार्यक्रमांतर्गत चैत्र महिन्याच्या चातुर्मास सप्तांतर्गत दिनांक 18 /4/ 2023 मंगळवार रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत भजनी सागर या भक्ती सागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांतर्गत तेलुगु ,मराठी, कन्नडा, हिंदी ,भजन गीतांचा कार्यक्रम सादर केला याप्रसंगी भजनी मंडळात श्रीनिवास चिलवेरी ,नागनाथ कारमपुरी ,लक्ष्मण देविदास व भाविक भक्त महिला उपस्थित होते.