पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सह.साखर कारखान्यावर अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल्याचे किर्तन करून सप्ताहाची आज सांगता झाली.
श्री विठ्ठल कारखान्यावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरणात सप्ताह उत्साहात पार पाडला.
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे गावकरी व वारकऱ्यांचा महाउत्सव असून संत विचारांची प्रेरणा देतात. यावेळी गावकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजनासाठी आयोजकांचे आभार मानले.
यावेळी परिसरातील महिला,कर्मचारी , अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.