भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासवाडी येथे इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन लोखंडे, माजी अध्यक्ष नवनाथ देठे,सागर लोखंडे, शिवाजी लोखंडे, समाधान देठे,संपत देठे, विनायक लिंगडे ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंतराव काळे प्रशाला जैनवाडी मुख्याध्यापक अनिल कौलगे ,मुख्याध्यापक पुरुषोत्तम सांगले व उपशिक्षक पोपट मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याकडून शाळेत दोन घड्याळ सप्रेम भेट देण्यात आली आहेत.
यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी विध्यार्थी गुणवत्ता विषयावर चर्चा करीत असताना इयत्ता पहिली मधील मुलीने इयत्ता चौथी इंग्रजी विषयाचे पुस्तक वाचून दाखविले आणि सर्व उपस्थित पालकांनी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून,कौतुक केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.