पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारांनां मास्क वितरण
सोलापूर प्रतिनिधी
गेल्या काही वर्षात कोरोना सारख्या महामारी ने जगात थैमान घातले होते या महामारी ला रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आरोग्य यंत्रणा मिळून या रोगाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते लॉक डाऊन संचार बंदी जमाव बंदी वेगवान लसीकरण करून या महामारी ला अटकाव केला होता या काळात पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून स्वतः चा जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गल्लोगल्ली जाऊन राज्य सरकार केंद्र सरकार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा च्या बातम्या केल्या होत्या या कोरोना महामारी च्या काळात वृतांकण करत असताना काही पत्रकार निधन पावले होते त्यामुळे अनेक पत्रकारांचे कुटुंब रस्त्यावर होते आता ती भयानक परिस्थिती जरी नसली तरी हल्ली कोरोना रुगांची संख्या वाढत असल्याच्या माहिती प्रसार माध्यमातून मिळत असल्याने खबरदारी चा उपाय म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारांना K N 95 मास्क चे वितरण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले
*पत्रकारांचे आरोग्य महत्वाचे*
पत्रकार हा समाजाचा मुख्य घटक असून आपल्या परिसरातील घडामोडी प्रसार माध्यमातून मांडत असतो बातमी साठी विविध भागात जात असतो पत्रकार हा प्रशासन व जनता मधील प्रमुख दुवा असून वार्ताकन करत असताना त्याला आपला जीव धोक्यात घालावा लागतो पत्रकारांचे आरोग्य अतिशय महत्वाचे असून पत्रकारांनी वार्ताकंनं करत असताना आपल्या जीवाची व परिवाराची काळजी घ्यावी असं आवाहन प्रदेश यशवंत पवार यांनी पत्रकारांनां केलं आहे
यावेळी जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर समन्व्यक श्रीकांत कोळी शहर संघटक मल्लिनाथ कोळी शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद युनूस आत्तार इम्तियाज अक्कलकोटकर शशिकांत उकरंडे श्रीकांत जाधव शिवाजी नागुरे चंद्रकांत चव्हाण सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते