केसकरवाडी प्रतिनिधी बिरुदेव केंगार
पंढरपूर तालुक्यामधील शेडगेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या आपल्या भाच्याच्या नातेसंबंधाचा दुरुपयोग करून सख्या मामाने त्याच्या भाच्याच्या केलेल्या फसवणुकीस पायबंद घालून मामाने भाच्याची जमीन घशात घालायचा केलेला प्रयत्न पुणे येथील मे. विभागीय सहनिबंधक संजयकुमार भोसले ह्यांनी हाणून पाडला.
ह्या बाबतीत अधिक माहिती अशी की पंढरपूर तालुक्यामधील शेडगेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या पोपट भिवा मासाळ ह्यांनी त्यांच्या मामा आणि पूर्वाश्रमीचे सासरे ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्यांना आर्थिक निकडीच्या कारणास्तव सन 2003 मध्ये काही रक्कम घेतली होती. आणि त्याच्या बदल्यात शेडगेवाडी येथील आपल्या मालकीची 6 एकर जमीन ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्यांना एका बिन कब्जा खरेदीखतच्या अन्वये पैसे परत देईपर्यन्त लिहून दिली होती. सदर सर्व रक्कम टप्प्याटप्याने फेडून सदर खरेदीखत रद्द करायचे असा मूळ व्यवहार सन 2003 मध्ये त्यांचे मध्ये ठरला होता.
त्या अनुषंगाने श्री पोपट भिवा मासाळ ह्यांनी काही रक्कम फेडल्याने श्री ज्ञानेश्वर वळकुंडे ह्यांनी 4 एकर जमीन परत देखील केली. परंतु उर्वरित जमीन रक्कम परत फेडूनही श्री ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्यांनी पोपट भिवा मासाळ ह्यांना त्यांची जमीन परत न केल्याने, मासाळ ह्यांनी सोलापूर येथील जिल्हा उप निबंधक सावकारी ह्यांच्याकडे तक्रार केली. पोपट भिवा मासाळ ह्यांची तक्रार आणि सर्व कागदपत्रे आणि वस्तुस्थिती पाहून सोलापूर येथील जिल्हा उप निबंधक सावकारी ह्यांनी सदर तक्रार मान्य करून ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्याच्या लाभात झालेले खरेदीखत दिनांक 27/07/2022 रोजी एक आदेश पारित करून रद्द केले.
सोलापूर येथील जिल्हा उप निबंधक सावकारी दिलेल्या दिनांक 27/07/2022 रोजी दिलेल्या सदर आदेशच्या विरोधात श्री ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्यांनी पुणे येथील मे. विभागीय सहनिबंधक संजयकुमार भोसले ह्यांच्याकडे एक अपील दाखल करून सदर आदेशास आव्हान दिले.
पुणे येथील मे. विभागीय सहनिबंधक संजयकुमार भोसले ह्यांनी सदर प्रकरणात सर्व साक्षी पुरावे तपासले. तसेच मूळ तक्रारदार म्हणजेच पोपट भिवा मासाळ ह्यांचे वकील लक्ष्मण सुखदेव केसकर ह्यांनी केलेला युक्तिवाद, आणि दाखल केलेले मे. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हाय कोर्ट ह्यांचे न्याय निवाडे लक्षात घेऊन सोलापूर येथील जिल्हा उप निबंधक सावकारी दिलेल्या दिनांक 27/07/2022 रोजी दिलेला सदर आदेश कायम केला. आणि श्री पोपट भिवा मासाळ ह्यांच्यावर चालू असलेला अन्याय दूर केला.
सदर प्रकरणात ज्ञानेश्वर भानूदास वळकुंडे ह्यांच्या वतीने वकील घाटगे ह्यांनी युक्तिवाद केला तर वर नमूद केल्याप्रमाणे पोपट भिवा मासाळ ह्यांच्या वतीने वकील लक्ष्मण सुखदेव केसकर ह्यांनी युक्तिवाद केला. वकील लक्ष्मण सुखदेव केसकर ह्यांनी गरजू व्यक्तीस न्याय मिळवून दिल्याबद्दल आणि मुख्यत्वेकरून श्री लक्ष्मण सुखदेव केसकर हे पंढरपूर तालुक्यामधील असल्याने पुणे येथे प्रॅक्टिस करूनदेखील तालुक्यामधील गोरगरीब पक्षकरांना अजूनही मदत करून अडचणी मधून बाहेर काढल्याबद्दल पंचक्रोशी मधील सर्व नागरिक आणि पंढरपूर तालुक्यामधील सर्व लोकानी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच सावकारी व्यवहारामध्ये कोणी दुर्दैवाने अडकल्यास पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या तालुक्यामधील वकील लक्ष्मण सुखदेव केसकर प्रॅक्टिस करत असल्याने त्यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील जाणकार आणि वरिष्ठ शेतकऱ्यांनी संपूर्ण पंढरपूर तालुक्यात आणि एकूणच सोलापूर जिल्हया मधील सर्व नागरिकांना केले आहे.
हयासंदर्भात केसकर वकिलांशी संपर्क केला असता त्यांनी असे नमूद केले की मामाने फसवून केलेल्या कागदपत्रांचा आधार घेऊन जमीन श्रीमती रुक्मिणी दत्तात्रय हजारे ह्यांना मोबादल्यापोटी विकली होती. परंतु मूळ व्यवहार हा सावकारीचा असल्याने आणि पोपट भिवा मासाळ ह्यांनी सर्व कागदपत्रे जपून ठेवल्याने आणि त्या अनुषंगाने साक्ष देखील दिल्याने हे शक्य झाले. सबब, सावकारीच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या वकिलांशी संपर्क साधावा. नुकत्याच सावकारी कायद्यात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर व्याजावर पैसे घेतले असले तरीही अनेक मार्ग ठेवलेले आहेत. त्यामुळे सतर्क राहून घाबरून न जाता योग्य वेळेस तक्रार केल्यास न्याय मिळू शकतो हा बोध सर्वांनी घेणे गरजेच आहे असेही मत वकील लक्ष्मण सुखदेव केसकर ह्यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केले.