पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित स्वाईप फॅमिली अंतर्गत भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा,निबंध लेखन,पोस्टर कॉम्पिटिशन, कविता वाचन, संविधान प्रतवाचन,इत्यादी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी स्कूलच्या प्राचार्या आणि कॉलेजच्या कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलेले नियम, स्त्री,पुरुष समानता,शिक्षणाची समानता,मतदानाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार,याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्ञानेश्वर वायदंडे,सचिन निकम,संपत लवटे,मुकुंद चौगुले,सविता झांबरे, श्रद्धा बिराजदार अमृता बाबर, रुजूता ओव्हाळ,शिक्षक रहीम मुलाणी,अमीर इनामदार,विनायक देवकते,सुनील भुताडे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रज्ञा कांबळे तर आभार प्रदर्शन रेखा बंडगर यांनी केले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिवादन करून सर्व विद्यार्थ्यांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.