भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यूज परिवाराकडून पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य व महाराष्ट्र जन वार्ता न्युजचे संपादक ,पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिंदे म्हणाले की आपण करीत असलेल्या पत्रकारिता बद्दल समाजात,जन माणसात चांगली ओळखली जात आहे.आपण सर्व सामान्य माणसाला मोठी प्रसिध्दी देण्याचे कार्य करीत आहे.त्यामुळेच आपणास अनेक मान सन्मान मिळाले आहेत. यापुढील कार्याशी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.
यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.