पंढरपूर प्रतिनिधी
अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर एम के इनामदार यांनी त्यांचे वाढदिसानिमित्त सपत्नीक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मा. डॉक्टर श्री एम के इनामदार यांचा सत्कार संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
यावेळी डॉक्टर हेमंत शिट्टी, युवासेना जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे, तन्वीर तांबोळी, शहाजी आघाडे इत्यादी उपस्थित होते.