सोलापूर प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर शहरातील अवैद्य बांधकाम विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर चक्री उपोषणाचे आंदोलन सुरू आहे परंतु महानगरपालिका प्रशासन कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अवैद्य बांधकामावर कारवाई करावे या मागणीचे निवेदन महानगरपालिका आयुक्त शितल तेली मॅडम यांना देण्यात आले या निवेदनात अवैध बांधकाम त्वरित कारवाई करा अन्यथा आंदोलनास सामोरे जा असा इशारा दिला आहे.
अलीकडेच सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य बांधकामे झाले व होत आहेत परंतु महानगरपालिकेचे प्रशासन व प्रशासकीय अधिकारी याकडे अक्षम दुर्लक्ष करीत आहे एकीकडे प्रशासकीय आयुक्त (हुल्ले)मॅडम या शहर विकास कामाच्या वेगवेगळ्या नियोजित आराखडे तयार करीत असल्याचे प्रसिद्धी माध्यमाद्वारे सोलापूर वासियांना माहिती देतात आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न करतात असे असताना मात्र अवैद्य बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी असताना देखील कारवाई केली जात नाही हा विषय विचार करण्याजोगी आहे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून अवैद्य बांधकामावर कारवाई करावी यासाठी उपोषण सुरू आहे आणि उपोषण कर्त्यांना निनावी नंबर द्वारे फोनवरून उपोषण करू नका आम्ही तुमचे काय आहे ते बघू असे विनंती वजा धमक्याचे फोन येत आहेत यावरून उपोषणकर्त्याचे व महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जीव धोक्यात आहे म्हणून याबाबत काही अप्रिय घटना घडली तर त्यांची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची व प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन ताबडतोब अवैध बांधकामावर कारवाई करा अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आले.
विष्णू कारमपुरी (महाराज )यांच्या नेतृत्वाखाली मा आयुक्त शितल तेली( हुल्ले) यांना निवेदन देताना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी, विठ्ठल कुराडकर ,रेखा आडकी, शोभा पोला, गुरुनाथ कोळी, मुनीर रंगरेज ,यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते