पिसेवाडी येथील अपघातात केंगार तरुणाचा मुत्यु .
अकलूज प्रतिनिधी जयराम घाडगे
पिसेवाडी तालुका माळशिरस येथील तरुण गणेश रामचंद्र केंगार याचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
पिसेवाडी येथील तरुणाचा सायंकाळी ६.०० वाजता अपघात झाल्याची व ॲम्बुलन्स वेळेत आली नाही ही माहिती वेळापूर पोलीस स्टेशनला मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव अपघात स्थळी धाव घेतली असता केंगार हा तरुण रोडवर पडलेल्या अवस्थेत दिसून आला. निलेश बागवे यांनी वेळापूर पोलीस कर्मचारी यांच्या समवेत त्याला उचलून पोलीस गाडीत घालून तातडीने अकलूज येथील दवाखान्यात दाखल केला असता यावेळी केंगार जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण त्यानंतर केंगारवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला वेळापूर पोलिसांनी खूप पळापळी करून त्याचा जीव वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला होता.
याची फिर्याद वेळापूर पोलीस स्टेशनला फिर्याद रामचंद्र केंगार यांनी राहणार पिसेवाडी यांनी दिली आहे.
अधिक वृत्त असे की दिनांक २४/४/२०२३ रोजी सहाच्या सुमारास गणेश रामचंद्र केंगार वय वीस वर्ष राहणार पिसेवाडी तालुका माळशिरस हा फिर्यादीच्या हिरो होंडा मोटरसायकल नंबर एम एच झिरो फोर ए व्ही ६१८ पूर्ण नंबर आठवत नाही यावरून शंकरराव मोहिते सहकारी सूतगिरणी समोरून माळशिरस कडून वेळापूर कडे त्याच्या साईडने येत असताना समोरून रॉंग साईडने मारुती स्विफ्ट डिझायर कंपनीची कार नंबर एम एच १४ इ सी ५३०३ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील नमूद कार अति वेगाने रोडची खबरदारी न घेता रॉंग साईडने चालून गणेश रामचंद्र केंगार याच्या मोटरसायकली समोरून जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मरणास व दोन्ही वाहनांच्या नुकसान होण्यास कारणीभूत झाला आहे. अशी नोंद वेळापूर पोलीस झाले आहे याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक संजय राऊत हे करीत आहे.