पंढरपूर प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्षाच्या वतीने पदाधीकारी यांनी साजरी करण्याचे आदेशा प्रमाणे वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने नवजीवन निवासी अपंग शाळा, पंढरपूर येथे विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी पंढरपूर तालुका यांच्या वतीने नवजीवन निवासी अपंग शाळा. पंढरपूर या शाळेत दिनांक १४/४/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा रविराज कांबळे मेजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व शाळेतील सर्व दिव्यांग बालकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
तसेच दिनांक १७/४/२०२३ रोजी दिव्यांग शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या ५० मिटर धावणे स्वाप्टबॉल थ्रो, व्हीलचअर अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम, व्दितीय, तृतिय क्रमांक आलेल्या मुला/मुलींना मा.श्री.पांडूरंग खांडेकर (युवा जिल्हा अध्यक्ष ) मा.श्री.लिंगेश्वर सरवदे (युवा जिल्हा संघटक) मा.श्री. अमोगी तेलंग (युवा जिल्हा महासचिव) मा श्री महादेव मस्के (युवा जिल्हा उपाध्यक्ष) मा श्री बिराप्पा मोटे (जिल्हा उपाध्यक्ष) मा. श्री. तानाजी कांबळे (जेष्ठ नेते) मा.कैलास ओव्हाळ ( वंचित नेते ) मा.श्री. दयानंद झेंडे यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडी पंढरपूर तालुका चे मा. श्री. सचिन तुपलोंढे (युवा तालुका अध्यक्ष) मा.श्री. दाजी सातपुते (युवा तालुका महासचिव) मा.श्री. नितीन गायकवाड,मा.श्री. रवि खरे (युवा तालुका उपाध्यक्ष) मा. श्री. अॅड. सुदत्त दंदाडे मा श्री हर्षल जाधव, मा.श्री. ललित चंदनशिवे, मा. श्री. सिताराम सातपुते, श्री. शहाजी शिखरे, श्री. समाधान गायकवाड, श्री. हरी पवार, श्री राहुल मस्के, श्री प्रकाश कांबळे, श्री. संभाजी सपताळ, श्री. संदिप ननवरे, श्री. खंडू लोखंडे, श्री.शिवाजी चौधरी श्री.हर्षराज कांबळे इत्यादी तालुका पदाधीकारी यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अथक परिश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन थोरात सर, श्री. धनाजी बोबडे, श्री. शंकर आयरे, श्री. धनंजय करंडे, श्री. अरुण गायकवाड, सौ.लता पवार यानी घेतले.