उपायुक्त कुर्हाडे यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत दिल्या सुचना
जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
मागील काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राबरोबरच अन्य जवळच्या भागातील गोरगरीब जनतेचे आधारस्तंभ असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालयात तात्काळ कार्डीयाक विभाग सुरू करण्यात यावा तसा प्रस्ताव तयार करुन तो मनपा आयुक्तांकडे पाठविण्यात यावा, अशी सुचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुर्हाडे यांना दिल्या आहेत.जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय आहे.या रुग्णालयात देण्यात येणार्या विविध आरोग्य सेवांबाबत रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या.
यावर मार्ग काढण्यासाठी आमदार वायकर यांनी सोमवारी संबंधित अधिकार्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुर्हाडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेश मोहिते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश सुखदेव, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष पाटील, विविध विभागातील अधिकारी वर्ग, माजी नगरसेवक बाळा नर, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शाखाप्रमुख अमर मालवणकर, बाळा तावडे, शाखा समन्वयक व स्वीय सहाय्यक उमेश कदम आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.विविध आजारांवर उपचारासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील गोरेगरीब जनतेची या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
परंतु एवढ्या मोठ्या रुग्णालयात कार्डीयाक विभाग नसल्याने आपत्कालिन प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना खाजगी रुग्णालयात अथवा कुपर रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते.यामुळे बर्याच अंशी उपचारास विलंब झाल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात.त्यामुळे ट्रॉमा रुग्णालयात कार्डीयाक विभाग सुरू करण्यात यावा, अशी सुचना आमदार वायकर यांनी यावेळी केली.तसेच रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या बहूद्देशीय कर्मचार्यांनी कंत्राटदाराकडून कर्मचार्यांना वेळेवर पगार देण्यात येत नसल्याच्या तक्रारी केल्या.यावर कंत्राटीपद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना कामगार कायद्यानुसार पगार देण्यात यावा, कर्मचार्यांना पगाराची स्लिप व भविष्यनिर्वाह निधी भरल्याची पावती देण्यात यावी, अशी सुचना वायकर यांनी हॉस्पिटल प्रशासन तसेच कंत्राटदाराला केली.रुग्णालयातील पॅथलॉजी लॅबमध्ये रिपोर्ट बनविण्यास विलंब लागत असेल तर रुग्णालयाच्या जवळील लेबोरेटी यांची नेमणुक करण्यात यावी.
तेथे रुग्णांना अथवा रुग्णांच्या नातेवाईकांना टेस्टसाठी पाठविण्यात यावे, परंतु अशा रुग्णांकडून त्या लॅबोरेटरींनी रुग्णांकडून अथवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे न घेता मनपाने ते पैसे भरावेत.मुंबई महानगरपालिकेचे हे ट्रॉमा रुग्णालय असल्याने रुग्णालयातील आर्थोपेडीक बेडच्या संख्येत वाढ करण्यात यावी.तसेच रुग्णालयात काही ठिकाणी सी.सी कॅमेरे बसविण्यात यावे,अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी दिली.