भाळवणी प्रतिनिधी
आजच्या काळामध्ये सर्व काही घरबसल्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने होत आहे. त्यामुळे अशा या डिजिटल युगामध्ये प्रत्येकालाच कम्प्युटर येणे खूप गरजेचे आहे. सध्याच्या काळामध्ये कम्प्युटर शिकणे एक खूप महत्वाची गोष्ट बनली आहे. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणेच कम्प्युटर येणे किंवा कम्प्युटरचा वापर करता येणे ही देखील आजची मूलभूत गरज बनत चालली आहे. कम्प्युटर शिकणे हे खूप सोपे आहे परंतु कॉम्प्युटर शिकण्यासाठी आपल्याला एक सर्वोत्तम कोर्स लावायला वाढतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने कॉम्प्युटरचे महत्त्व लक्षात घेऊन MS-CIT हा कॉम्प्युटर कोर्स चालू केला आहे.
आयटी संकल्पना शिकण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम एस सी आय टी कोर्स शिकणे खूप आवश्यक या आहेत. माहिती संप्रेक्षण तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीच्या संकल्पाने शिकवून देणे हे एमएससीआयटी कोर्स चे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणून आजच्या ” MSCIT Full Form in Marathi । एम एस सी आय टी म्हणजे काय?” आर्टिकल मध्ये आपण एम एस सी आय टी कोर्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. MSCIT म्हणजे काय? What is MSCIT course :
MS-CIT हा एक कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स जो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतला जातो. व हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे सर्टीफिकीट देखील दिले जाते.
MS-CIT चे संपूर्ण स्वरूप ” महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन टेक्नॉलॉजी “ असे होते. एम एस सी आय टी हा कोणता कॉम्प्युटर शिकण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. तसेच अलीकडच्या काळामध्ये MS-CIT Course ला अधिक लोकप्रियता प्राप्त झाली आहे. दहावी- बारावी झालेले विद्यार्थी हमखास एम एस सी आय टी कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स करतातच .
MS-CIT Course 2001 मध्ये महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ( MKCL ) द्वारे सुरू केलेल्या आयटी साक्षरता कोर्सचा संदर्भ देते. एम एस सी आय टी कोर्स केल्यामुळे लोकांमध्ये आयटी साक्षरता, सतर्कता, कार्यक्षमता आणि कॉम्प्युटर संबंधीचे सर्व ज्ञान प्राप्त करण्याचा फायदा होतो. MS-CIT हा कोर्स केल्याने ना केवळ आपल्याला कॉम्प्युटरचे ज्ञान मिळते याशिवाय आपण एम एस सी आय टी कोर्स द्वारे चांगल्या प्रकारे जॉब देखील मिळवू शकतो. एम एस सी आय टी हा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतला जाणारा एक कॉम्प्युटर कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कम्प्युटर संबंधीचे सर्व ज्ञान मिळते. सोबतच महाराष्ट्र शासनाचे सर्टीफिकीट देखील मिळते.
MS-CIT Course अभ्यासक्रमांमध्ये शिकविले जाणारे विषय :
एम एस सी आय टी अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे विषय खालीलप्रमाणे आहेत-
दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेटचा वापर कसा करावा.
एम एस वर्ड 2019
Window 10
हार्डवेअर आणि नेटवर्किंग काय आहे याबद्दल माहिती
MS world 2019
MS Excel 2019
MS PowerPoint 2019
MS outlook
ERA
Theory
MS-CIT Course मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम :
1. Computer Introduction :
कोर्समध्ये सुरुवातीला तुम्हाला कम्प्युटरची ओळख करून दिली जाते. कॉम्प्युटर कशाप्रकारे चालू करावे बंद करावे या संबंधित सर्व माहिती MS-CIT या कोर्समध्ये शिकवली जाते. आपल्यातील काही व्यक्तींना कॉम्प्युटर बद्दल जराही ज्ञान नसते त्यामुळे एम एस सी आय टी कोर्स मध्ये सुरुवातीला कम्प्युटर इंट्रोडक्शन शिकविले जाते.
2. Window 10 :
विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. कम्प्यूटर मध्ये वापरली जाणारी सामान्य ऑपरेशन या विन्डोज दारी शिकवली जातात. एम एस सी आय टी कोर्स मध्ये तुम्हाला विंडोज बद्दल संपूर्ण ज्ञान दिले जाईल. थीम कशी लावायची, फाइल आणि फोल्डर व्यवस्थापन आणि विंडोज मीडिया प्लेयर याबद्दल सर्व ज्ञान यामध्ये दिले जाते.
3. वर्ड प्रोसेसिंग :
वर्ड प्रोसेसिंग मध्ये बेसिक ऑपरेशन शिकवले जातात. जसे की, हेडर आणि फुटर घालने, डॉक्युमेंट तयार करणे, पेज सेटअप लागू करणे, पीडीएफ तयार करणे आणि एडिट करणे इत्यादी शिकविले जाते.
4. 21 व्या शतकातील जीवन कौशल्य/ अभ्यास कौशल्य :
नेट बँकिंग, सायबर क्राईम संरक्षण इत्यादी कसे वापरायचे याबद्दल माहिती शिकवली जाते यासोबतच यु ट्यूब, विकिपीडिया यांसारखे प्लॅटफॉर्म चा वापर कसा करावा शिकविले जाते.
5. एम एस आऊट लुक :
Ms outlook मध्ये नवीन ईमेल खाते कसे तयार करावे शिकवले जाते.
6. स्प्रेड शीट :
स्प्रेडशीट मध्ये डेटा विश्लेषण, वर्कशीट चे आयोजन, मुख्य सारण्या तयार करणे आणि फंक्शन वापरणे इत्यादी शिकवले जाते.
MS-CIT Course साठी आवश्यक पात्रता :
MS-CIT Course शिकणे हे सर्वांसाठीच फायद्याचे आणि गरजेचे ठरते त्यामुळे एम एस सी आय टी साठी कोणती आवशक्य पात्रता नाही.
साधारणता एम.एस.सी.आय.टी हा कोर्स कोणालाही करता येतो. आठवीत असलेल्या विद्यार्थ्या पासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण एमएस-सीआयटी हा कोर्स करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच अन्य कोर्स प्रमाणे एमएस-सीआयटी हा कोर्स साठी कुठल्याही अटी आणि नियम नाहीत.
MS-CIT Course चा कालावधी । MS-CIT हा कोर्स किती महिन्यांमध्ये पूर्ण होतो?
एम एस सी आय टी हा कोर्स साधारणता तीन ते चार महिन्याचा असतो परंतु तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये हा कोर्स लावला आहे आणि तुम्हाला किती वेळे साठी कॉम्प्युटर वापरण्यासाठी देतात त्यावर देखील एमएस-सीआयटी कोर्सचा कालावधी अवलंबून असतो. जर एखाद्या अकॅडमी मध्ये तुम्हाला रोज दोन ते तीन तासासाठी कॉम्प्युटर वापरण्यासाठी देतात तर हा कोर्स तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतो.
MS-CIT कोर्स पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात?
MS-CIT Course ची फी साधारणता चार हजार सातशे (4,700) एवढी असते परंतु तुम्ही जर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स लावत असाल तर तुम्हाला तिथे सहा हजार (6,000) पर्यंत असू शकते.
MS-CIT Course कंप्यूटर साठी येणे अनिवार्य आहे का?
MS-CIT हा कोर्स मुळातच कम्प्युटर शिकण्यासाठी लावला जातो त्यामुळे एमएससीआयटी कोर्स साठी कम्प्युटर अनिवार्य नाही एम एस सी आय टी कोर्स मध्ये कंप्यूटर बेसिक फंक्शन पासून ते हाय लेवल फंक्शन पर्यंत सर्व काही शिकविले जाते. तसेच या कोर्ससाठी तुमच्याकडे वैयक्तिक कॉम्प्युटर असणे देखील अवशक्य नाही.
एमएससीआयटी ( MS-CIT ) केल्यायानंतर कोण कोणते जॉब मिळू शकतात?
एकदा एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी क्षेत्रातील असंख्य नोकर्या करण्यासाठी आपण पात्र ठरतो.
एम एस सी आय टी केल्यानंतर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो याशिवाय ओसीआर प्रोग्रामर, आयटी सल्लागार, संगणक चालक, डेटा अनालीटिक्स, डेटा ऑपरेटर, इंटरफेस अभियांता यासारखे अनेक इतर जोब मिळू शकतात.
कॉम्प्युटर शिकल्यानंतर मी पैसे कमवू शकतो का?
कॉम्प्युटर शिकणे हे एक असे स्किल आहे ज्याचा वापर करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी कंप्यूटर येणे अनिवार्य आहे असे कितीतरी व्यक्ती आहेत जे घरघरसून कम्प्युटरच्या सहाय्याने लाखो पैसे कमवितात.
Freelancing, Blogging, Vlogging, Digital Marketing, Affiliate Marketing करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता.
प्रवेशासाठी संपर्क:-किर्ती कॉम्प्युटर्स,डॉ.खांडेकर हॉस्पिटल समोर,भाळवणी 9975750406