पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूरचे शिवसेना शहर अध्यक्ष संदीप (भैया) केंदळे, यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे, यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन कुटूंबास या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
यावेळी आमदार साहेब यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
एका सामान्य कुटूंबातील सामाजिक चळवळीतून तयार झालेला समाजसेवक आपल्यातून आचानक गेल्यामुळे कुटूंबासह जनतेसाठीही एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असे उद्गार काढले.
सदर प्रसंगी श्री.नानासाहेब कदम, दिपक बाबा भोसले, किशोर भाई भोसले, बादल सिंग ठाकूर,विनोद राज लटके प्रसाद भैया कळसे शेखर बंटी भोसले दत्ता काळे महाराज,श्री.भास्कर (तात्या) जगताप, श्री.दत्तात्रय पाटील, शनी महाराज घुले, परसू पवार, चंद्रकांत क्षीरसागर आदी जण उपस्थित होते.