पंढरपूर प्रतिनिधी
आज येथे पंढरपुर कुर्डूवाडी रोडवर आढीव ता.पंढरपूर येथेशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतिने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व इतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके यांना कांदा उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी लक्ष वेधले, यावेळी बोलताना घोडके म्हणाले की राज्यात शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट अशी सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त करणे हे या सरकारचे धोरण आहे, हे शेतकरी विरोधी मिंधे सरकार शेतकर्यांसोबत घात करत आहे तरी या सरकारच्या विरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडू व शेतकर्यांना न्याय मिळवून देवु असे घोडके म्हणाले,
यावेळी बोलताना शिवसेना युवासेनेचे युवानेते रणजित बागल म्हणाले की, सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांसोबत दगाबाजी धोरण अवलंबले आहे, कोणतीही अट शर्त न ठेवता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ प्रति क्विंटल 500 रू. अनुदान त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावेत, कांदा उत्पादक शेतकर्यांना परदेशी कांदा निर्यातीस लागणारा खर्च हा शासनाने उचलावा व कांदा निर्यातीस लागणारा कर देखील माफ करण्यात याव्या तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, आगामी काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध राहु असे सुतोवाच बागल यांनी केले.
यावेळी शिवआरोग्य सेनेच्या जिल्हा संघटिका डाॅ. राजश्री क्षीरसागर बोलताना म्हणाल्या की कांदा उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर दिसत नाही, या सरकारला राज्यातील हजारो गोरगरीब शेतशिवारात कष्ट करणाऱ्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात असलेल्या अश्रुंची नक्कीच किंमत शिवसेना आगामी काळात चुकती करेल असा इशारा यावेळी क्षीरसागर यांनी दिला..
यावेळी दिनकर दाजी चव्हाण व शंकर (महाराज) चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले..
यावेळी शिवसेना विभागप्रमुख उमेश काळे,विभागप्रमुख संजय कृष्णा घोडके,विभागप्रमुख बाळासाहेब पवार,विभागप्रमुख प्रशांत जाधव,भारत कदम,मा.उपतालुकाप्रमुख हरिश्चंद्र तळेकर,पितांबर कापसे,म्हमाजी भुसे,नंदकुमार भुत्ते,नामदेव चव्हाण,औदुंबर चव्हाण,सुखदेव कोरडे,वैभव ननवरे,विजय जाधव,नवनाथ सुरवसे,विलास कांबळे,प्रशांत आसबे,महिला आघाडी संघटीका संगिताताई पवार,महिला उपशहर संघटिका मंजुळाताई धोंडमिसे, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पप्पू तांबोळी,उपजिल्हा युवा अधिकारी आकाश माने, उपतालुका युवाअधिकारी समाधान गोरे, शहरयुवाअधिकारी श्रीनिवास उपळकर,तालुकायुवाअधिकारी प्रणित पवार, शहर युवासेनेचे विशाल डोंगरे,सुरज कांबळे,सोमनाथ घोगरे,माऊली चव्हाण,आबासाहेब चव्हाण,दादा आसबे,उमेश धुमाळ,शंकर सुरवसे,एकनाथ चव्हाण यांच्यासह शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह आढीव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.