अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर येथील काही गावांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती या दोन्ही तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते याची दखल घेत दक्षिण सोलापूर मधील हातुर गावातील कुलकर्णी तांडा येथे पूरग्रस्तांना चादर व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की लायन्स क्लब प्रांत 32 34 ड- 1 चे माननीय प्रांतपाल लायन राजशेखरजी कापसे यांनी लायन आंतरराष्ट्रीय संघटनेला पूरग्रस्तांना तातडीची मदतीची मागणी केली होती त्यामुळे लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना LCIF कडून 10000 डॉलर म्हणजे जवळपास 8 लाख 25 हजार रुपयांच्या तात्काळ मदत प्रांतातील पूरग्रस्तांसाठी देण्यात आली होती.
ही मदत प्रांताकडून वेगवेगळ्या ठिकाणी वाटप करत होती. याबाबत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी प्रांतपाल व त्यांच्या टीम कडे लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी ला विविध गावचे सरपंच आणि गावकऱ्यांचे मदतीसाठी आलेले निवेदन देऊन व सातत्याने त्याबाबत पाठपुरावा करून प्रांताकडून दक्षिण सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी प्रांताकडून 100 चादर व ब्लॅंकेट मिळवून घेत लायन संघटनेच्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका लायन डॉक्टर अरुणाजी ओसवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरातील हत्तुर गावामधील कुलकर्णी तांडा येथे प्रांतपाल राजशेखरजी कापसे यांच्या हस्ते व अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे प्रांतीय सभापती सौ.नंदिनी जाधव ज्येष्ठ लायन मुकुंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथील पूरग्रस्तानां शंभर चादर व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या यांच्यामार्फत लायन्स इंटरनॅशनल कडून मिळालेल्या चादर व ब्लॅंकेट बद्दल आनंद व्यक्त केला आणि लायन्स क्लबचे आभार मानले.
आणि गावकऱ्यांच्या वतीने प्रांतपाल राजशेखरजी कापसे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे प्रांतीय सभापती सौ. नंदिनी जाधव, मुकुंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरग्रस्त भागातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.