भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प मधुकर महाराज गिरी यांच्या कीर्तनाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ मारुती मंदिरासमोर आज बुधवार दिनांक 01/03/ 2023 रोजी संध्याकाळी 6=30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरीराव व महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले नगरसेवक निलराज डोंबे, युवक नेते दीपक पवार, चंद्रभागाचे माजी संचालक ई बा मुलाणी यांच्या उपस्थित होणार आहे.
तरी परिसरातील ग्रामस्थांनी या कीर्तन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आव्हान ग्रामक्रांती तिसरी युवक आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.