मारापुर प्रतिनिधी
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांचा मारापुर ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार मारापुरचे लोकनियुक्त सरपंच व मानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.यादव यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी बेस्ट सभापती हा पुरस्कार मिळवून मंगळवेढ्याचे नाव राज्यभर करण्यात मोलाचा वाटा आहे श्री.आवताडे हे अत्यंत संयमी युवा नेतृत्व असून ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून जातात. भारतासारख्या कृषीप्रधान देशात सहकार आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर राजकीय कार्यक्षेत्रात तितक्या जोमाने उतरणे गरजेचे आहे हे ओळखून विविध राजकीय घडामोडी मध्ये आपले संघटन कौशल्य सिद्ध केले आहे असे सांगितले.
सत्कार समारंभाला मार्गदर्शन करताना श्री. आवताडे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले कारण सध्या झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आवश्यक खर्च टाळावा असे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी युवा उद्योजक राजकुमार यादव,अविनाश मोरे,डॉ.सत्यवान यादव, अशोक आसबे, भुजंगराव आसबे, बापूराव इंगळे, अंकुश आसबे,तुकाराम यादव,विक्रम यादव,राजकुमार आसबे , गजानन माने इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते