सोलापूर प्रतिनिधी
श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या 47 व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त सोलापूर सह संपूर्ण विश्वात शांती व सौख्य आणि सौभाग्य राहावं यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मधील महालक्ष्मी देवी मंदिरापर्यंत जलकुंभ यात्रा काढून महालक्ष्मी देवी महाभिषेक करण्यात आले
श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या 47 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या विविध धार्मिक, सामाजिक ,सांस्कृतिक व समाज उपयोगी कार्यक्रमांतर्गत सोलापूर सह संपूर्ण विश्वात शांती सौख्य सौभाग्य आबादीत रहावे यासाठी महिला भक्तांनी कुचन नगर येथील सुशीला मठापासून सिव्हिल हॉस्पिटल मधील श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत जलकुंभ यात्रा काढण्यात आली.
त्यानंतर महालक्ष्मी देविस महाभिषेक करून महाआरती करण्यात आली या जलकुंभयात्रेत शेकडो महिला भगिनी सामील झाले होते सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला माता-भगिनींना हळदीकुंकू चा कार्यक्रम केला त्यानंतर सर्व भावीक भक्तांना आंबील प्रसाद, अभिषेक व फळ फळावर वाटप करण्यात आले सर्वांनी एकमेकाला गुढीपाडव्याच्या आणि दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा दिल्या
सदर जलकुंभ यात्रा पुण्यतिथी महोत्सवाचे प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) श्रीनिवास कुसुरकर (महाराज) व श्रीनिवास चिलवेरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
सदर कार्यक्रमास यमुनाबाई पिसका कविता कैरम कोंडा सुनंदा कुसुरकर अनुसुर्या कारमपुरी शोभाताई पोला ,माणिक कन्ना प्रियंका कुसुरकर ,श्रीदेवी कुसुरकर, पवित्र कारमपुरी ,वरलक्ष्मीचन्ना मनीबाई गरदास , लिंगवा गेंट्याल लक्ष्मीबाई येमूल त्याचबरोबर आडवोकेट मुनिनाथ कारमपुरी ,नागार्जुन कुसुरकर, श्रीकांत कुसुरकर, विष्णू चीलका, सिद्राम पोला, चंद्रकांत कैरमकोंडा ,व्यंकटेश कैरमकोंडा, आधी भावी भक्त उपस्थित होते.