सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रयोजित ' नुमेरिकल मेथडस युसिंग सायलाब ' या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये सायलाब या अत्यंत बहुउपयोगी ओपन सोर्स च्या प्रभावी वापर याविषयी माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्रा. रविकांत खामीतकर,प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात उपस्थित होते. सदर कार्यशाळेत ऑफलाईन व ऑनलाईन मिळून एकूण 204 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भारत भरातून तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये सायलाब या ओपन सोर्स सॉफ्टवेअर बद्दल प्रा. रविकांत खामीतकर व डॉ. इम्रान चंदरकी या प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. मन्सूर आली काझी, प्रा. सविता कोंडा, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. रवींद्र देशमुख, प्रा. अमित कांबळे, श्री. प्रवीणकुमार शिंदे, श्री. राजकुमार पांढरे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. इम्रान चंदरकी काम पाहिले.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रुती धुमाळ तर आभारप्रदर्शन डॉ. भावना श्रीवास्तव यांनी केले.