पुणे प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त दि.12/3/2023 रोजी वेध फाऊंडेशन अंतर्गत रणरागिणी नॅशनल अवार्ड वितरण सोहळ्यास छाया काकडे ऊपस्थित होत्या.पुणे येथील सिंहगड रोड नर्हे येथील जाधवर इनस्टीट्यूटच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून सहकार आयूक्त मा.अनिलजी कवडे (IAS) पुणे डी.सी.पी.स्वार्तनाजी पाटील,राजारामजी स्वामी (डी.सी.पी पुणे) आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा.गणेश सोनूने (मनपा पुणे) ह.भ.प. शंकर महाराज(किर्तनकार) यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
यावेळी छाया काकडे म्हणाल्या की तसे आजपर्यंत मला 165 पुरस्कार समाजिक सेवेसाठी मीळाले असून त्यात आज आनखीन एका पुरस्काराची भर पडली आहे. या सर्व पुरस्काराच्या माध्यमातून 3'200,000 (बत्तीस लाख) रू. रक्कम मीळाली असून ही रक्कम मुंलींच्या शिक्षणासाठी खर्च करतेच आहे, पण यातली काही रक्कम मी जिव्हाळा वृध्दाश्रमासाठी यापुढे खर्च करनार आहे.
आजचा हा अवार्ड मला ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्रदान झाला असून शिक्षणाची पंढरी असलेल्या व सावित्रीबाईनी शिक्षणाची दारं मुली व महिलांठी खूलं केलेल्या पुणे नगरीत मला मीळाला हे माझं भाग्य समजते व आगामी काळातही समर्पित भावनेने काम करन्याचा विश्वास अपणास देते.असे काकडे यांनी सांगितले.