पंढरपूर प्रतिनिधी
श्री विष्णुपद मंदिर येथे तामिळनाडू येथील महिला भाविक दर्शनासाठी आले असता पायावर घसरून पाण्यात पडल्या. सदरचे पाणी वाहते असल्याने महिला भाविक पाण्यात वाहत जाऊ लागली.
सदरची घटना पाहताच तेथील असणारे पुजारी संग्राम कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता सदर महिला भाविकाचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून सदर महिला भाविकाचा जीव वाचविला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.