पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चैत्री यात्रेनिमित्त वारकऱ्यांसाठी आणि पंढरपूर मधील स्थानिक नागरिकांसाठी रविवार 3 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिबिराच्या आयोजक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूरच्या तालुका समन्वयक मनिषा वासकर यांनी दिली.
या शिबिरात ईसीजी, शुगर, रक्त तपासणी, रक्तगट, रक्तदाब आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. नेत्रतपासणी शिबिरात प्रथम येणाऱ्या रुग्णांना पाचशे चष्म्याचे मोफत वाटप ही केले जाणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य मिळणार आहे. प्रदक्षिणा रस्त्यावरील श्री कालिकादेवी मंदिराजवळील वासकर वाड्यात 3 एप्रिल रोजी हे शिबीर सकाळी अकरा ते सायंकाळी चार पर्यंत सुरु राहणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सौ.वासकर यांनी केले आहे.