दहिसर प्रतिनिधी उदय वाघवणकर
दहिसर - पुर्व येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे सौ. माधुरी दत्ताराम घुगे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आदर्श समाजोपयोगी कार्याला विशेष योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अशोक पत्की यांच्या शुभहस्ते आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.