सोलापूर प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लोकशाही तंत्र या युट्युब चॅनल चे पत्रकार राज जहागीरदार यांनी माजलगाव शहरातील दारू मटका व इतर चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसाय विरोधात आपल्या लोकशाही तंत्र या युट्युब वर बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून दिनांक 13 मार्च रोजी रात्री 10 : 42 वाजता पत्रकार राज जहागीरदार आपल्या मोटारसायकल वरून जात असताना माजलगाव येथील मटका बुकी चालक व त्याच्या साथीदाराने त्यांच्या मोटारसायकल ला धक्का देत त्यांना खाली पाडून आमच्या मटका व्यवसाय ची बातमी का लावतो म्हणून पत्रकार राज जहागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता व जबर मारहाण केली होती. या बाबत पत्रकार राज जहागीरदार यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या बाबत माजलगाव पोलिसांनी कलम 324 323 506 34 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून गंभीर मारहाण प्रकरणी हे कलम पुरेशी नसून पोलिसांनी प्राणघातक हल्ला बाबत इतर कलमे लावायला हवी होती.
राज्यातील पत्रकारांवरील हल्ले चिंतनीय बाब
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून तो समाजातील चांगल्या वाईट घटना सर्वसामान्य माणसासमोर आणण्याचं काम करत असतो हल्ली बातमी लावण्यावरून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात कमालची वाढ झालेली दिसत असून बातमी लावणावरून प्राणघातक हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा सवाल निर्माण झाला असून पत्रकारांवरील वाढत्या हल्लामुळे राज्यातील पत्रकार भयभीत झाले आहेत सदर ची घटना लोकशाही ला मारक असून पुरोगामी महाराष्ट्र ला कलंकित करणारी आहे लोकशाही चा चौथा स्तंभ आज अत्यंत वाईट व बिकट परिस्थिती मधून वाटचाल करत असताना प्राणघातक हल्ला होणे ही बाब खेदाची असून अश्या पत्रकार राज जहागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर तडीपार ची कारवाई करण्यात यावी.अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.