सोलापूर प्रतिनिधी
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातुन महाराष्ट्र शासनाच्या सोलापुर महानगपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांचा विकास योजने अंर्तगत प्रभाग १२ अक्कलकोट MIDC मधील ६ रस्त्यासाठी ६० लाख रुपये बजेट मंजूर केले होते. त्या बजेटमधुन
१) येमूल इंडस्ट्रीज ते MSEB ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे
२) MSEB ऑफिस ते ईजी एक्सपोर्ट समोरचा रस्ता डांबरीकरण करणे
३) K. K. देवसानी समोरचा रस्ता डांबरीकरण करणे
४) गेंटयाल टेक्सटाइल्स ते कन्हैय्या समोरचा रस्ता डांबरीकरण करणे
५) राज ग्रेनाइट समोरचा रस्ता डांबरीकरण करणे
६) सनत नगर येथे LK घर ते गुड़ शेफर्ड शाळेपर्यंत रस्ता करणे
वरील ६ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अक्कलकोट रोड MIDC कन्हैय्या एक्सपोर्ट जवळ येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मल्लिकार्जुन कमटम, श्रीधर बोल्ली, नीलेश फोफलिया, सुधाकर गुंडेली, सिद्धेश्वर गड्डम, तिरुपती परकीपंडला, श्रीशैलम बुरा, रमेश डाकलिया, ओंकार अड़गटला, अमर देवसानी, योगेश म्याकल, सनी मडूर, श्रीनिवास येमुल, नरसिंग तुम्मा, सदानंद कोडम, गिरीश मादास, नारायण आडकी, गजानन बोकाढे, धनंजय मादगुंडी, जयंत आकेन, प्रभाकर बोकाढे, सुरेश नक्का, दयाकर तोर्रा, प्रशांत मालानी, सैफन फुलमामडी, कमल फोफलिया, गिरीश फोफलिया गेंटयाल मालक, दंतकाळे मालक यांच्यासह इतर कारखानदार व कामगार बंधुभगिनी उपस्तित होते.