भाळवणी प्रतिनिधी
सह.शिरोमणी वसंतराव काळे यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे विद्यामंदिर भाळवणी या ठिकाणी निराधार व गरजू महिलांना साडीवाटप कार्यक्रम घेण्यात आला .
सदर कार्यक्रम प्रसंगी दादांच्या प्रतिमेचे पूजन मालनताई वसंतराव काळे ,तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री ताड , सविता लोखंडे , जयश्री काळे ,संस्थेचे सचिव हणमंत जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी राजश्री ताड यांनी आपल्या मनोगतात दादांनी केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य तसेच निराधार लोकांना आधार दिला याचा उल्लेख केला .त्यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून लोकांना भरपूर प्रमाणात सहकार्य केले.
तसेच जयश्री काळे यांनी आपल्या मनोगतात दादांनी अनेक संस्था स्थापन करून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला .
संस्थेचे सचिव हणमंत जमदाडे यांनी आपल्या मनोगतात दादांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांचे कार्य सुरू झाल्यापासून साक्षीदार असल्याचे सांगितले.त्यांनी तालुक्यामध्ये दादांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला .तसेच प्रशालेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात व शाळेचे कामकाज व्यवस्थित चालू असलेबद्दल समाधान व्यक्त केले .
यावेळी विद्या जमदाडे यांनी दादांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच दादावर कवितेच्या माध्यमातून महती स्पष्ट केली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी काळे यांनी केले तर अश्विनी शिंदे यांनी आभार मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय काळे तसेच सुहास चौगुले ,आबासो जाधव, सचिन काळे ,इरफान शेख ,नागनाथ जाधव ,अतुल गायकवाड, लिंगे ,वाघमारे ,लिंगे मामा या सर्वांनी परिश्रम घेतले.