चिंचवड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), रा.स.प., रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, खासदार श्री.श्रीरंग बारणे, आमदार श्री.महेश लांडगे, आमदार सौ. उमाताई खापरे, श्री.शंकर जगताप यांच्याह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकनेते स्व.लक्ष्मणभाऊ जगताप प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनीताई जगताप बहुमताने विजयी होतील, असा संकल्प यावेळी करण्यात आला.