पंढरपूर प्रतिनिधी
बँड बँजो कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य, पंढरपूर यांच्या वतीने सिने अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बँड पथक वाजवून निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष प्रा.अशोकराव जाधव यांनी मनोगत व्यक्त करून महेश मांजरेकर यांचा जाहीर निषेध केला.
सांगली जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तेरदाळे यांनी महेश मांजरेकर यांनी जर कलाकारांची जाहीर माफी नाही मागीतली तर याही पेक्षा खूप मोठं आंदोलन उभ करू.
यावेळी उपस्थित ,सुभाष अडागळे प्रदेश सरचिटणीस आनंदराव भोंडवे प्रदेश संघटक, गणेशराव साळुंखे कोरेगाव ता. अध्यक्ष दत्तात्रय जाधव सर प्रदेश सचिव, पंढरपूर ता. अध्यक्ष मारुती प्रक्षाळे ,गडशी समाज अध्यक्ष प्रकाश वनारे,नाथा प्रक्षाळे,पंढरपूर होलार समाज अध्यक्ष बिरदेव केंगार,सांगोला ता. अध्यक्ष सुशीलकुमार मागाडे,करमाळा अध्यक्ष झाकीरभाई,पिंटू सावंत,बापू वनसाळे, अंबादास वनारे, अमर वनारे, गौरव भोसले, अनिल धुमाळ, नागनाथ भोसले, सुरज भोसले,भोसले सुभाष जगदने, इत्यादी उपस्थित होते.