भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शिवभक्त फेस्टिवल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, पांडुरंगाचे व्हा.चेअरमन कैलास खुळे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,सांगोला युवक नेते डॉ.बाबासाहेब देशमुख,युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल,भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, पांडुरंग चे संचालक भगवान चौगुले,तानाजी वाघमोडे,हरिभाऊ शिंदे, ई.बा. मुलाणी,शिवसेना तालुकप्रमुख शिवाजी बाबर,रीपाईचे कार्याध्यक्ष सचिन भोसले,रयतचे सुनील पाटील,सरपंच राजकुमार पाटील,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष राजश्री ताड,उपसरपंच सविता लोखंडे, ग्राम सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुळूज येथील पांडुरंग ताटे महाराज यांच्या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच राज्य स्तरीय खुल्या डान्स स्पर्धा,जादूगार गुरुदास,झंकार बिट्स व डोळे तपासणी शिबिर ही घेण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सांगता भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश पाटील यांनी केले तर आभार संभाजी चौगुले यांनी मानले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळातील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.