हुबळी धारवाड प्रतिनिधी
बैलांसोबत धावणारा हा धावपटू श्रीनिवासन गौडा आहे.कर्नाटकमध्ये कंबाला जॉकी ही पारंपरिक स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेमध्ये बैलांच्या जोडीबरोबर धावायचे असते. जो सर्वात कमी वेळात ठराविक अंतर पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते. या स्पर्धेत १०० मी. एवढे अंतर श्रीनिवासनने ९.५५ सेकंदांमध्ये पूर्ण केले असून त्याने उसेन बोल्टचा विक्रमही मोडीत काढला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याची दखल घेत त्याचा फोटो व्हायरल केला, तो देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारत सरकार देखील त्याचा ऑलम्पिकसाठी विचार करेल असेच वाटतंय...
ग्रामीण भारतातील हे टॅलेंट जागतिक दर्जाची कीर्ती संपादन करेल हीच अपेक्षा आहे