सोलापूर प्रतिनिधी
युनायटेड भावसार ऑर्गनिझेशन सोलापूर व भावसार समाज वधु वर सूचक सेवा भाव तर्फे वधू वर पालक मिटिंग हिंगुलांबीका सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली
उपवर व उपवधू उमेदवार समक्ष असल्यास सभागृहात प्रवेश ही नवी संकल्पना मांडून हा भावसार वधू वर पालक मिटिंग आयोजित करण्यात आली होती
या मिटिंगचे उदघाटन समाजातील जेष्ठ सदस्य श्री जनार्धन नवले, श्री रमेश राव डोईजोडे, श्री यल्लपा अण्णा महिंद्रकर, ललित सूर्यान , सुधीर शेळके यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी स्टेज वर युबीओ चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे , अमोल हिबारे , स्मितल पुलकर , युबो चे सोलापूर चे अध्यक्ष सिद्राम हंचाटे रवी लाडे,सुहास क्षीरसागर संजय पतंगे आदि उपस्थित होते. या वधू वर पालक मिटिंग साठी जवळपास 270 वधू वर ने नोंद केली होती
या मिटिंगचे विशेष म्हणजे यावेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात वधू ने स्टेजवर येऊन स्वताची ओळख करून दिली.गुलबर्गा , विजापूर बिदर , कोल्हापूर, उस्मानाबाद पुणे मुबई धुळे जालना इतर जिल्हातून वधू वर पालक सहीत या मिटिंग या उपस्थित होते
ही पूर्ण मिटिंग ही पेपरलेस होती टेक्नॉलॉजी चा वापर करून नाव नोंदणी गुगल फॉर्म च्या माध्यमातून करण्यात आली होती आणि या मिटिंग मध्ये उपस्थित असण्याऱ्या ची यादी पण पीडिफ च्या माध्यमातून देणार आहे
वधु वर ची ओळख सौ नंदा क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, सुषमा डोईजोडे, रसिक वळसे,वर्षा डोईजोडे, ज्योती झिंगाडे, स्नेहा रंगदाळ , विद्या हंचाटे, किरण रणसुभे मेघा पतंगे यांनी करून दिली.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युबो चे माधव वळसे, सौ अनिता व प्रकाश भांबुरे, दीपक आकुडे, राजेश झिंगाडे, श्रीकांत रंगदाळ, हर्षद क्षीरसागर, उमेश डोईजोडे, संजय सुलाखे , श्वेता व किरण कुमार मुसळे, लक्ष्मीकांत मुसळे, श्री व सौ अरुण हंचाटे , प्रकाश जवळकर ,अंजली व प्रभाकर कुसुमकर , सागर सरवदे, प्रभाकर जवळकर, शशी बासूतकर मनोज क्षीरसागर सागर सरवदे मनोज महिंद्रकर रवी वायचळ , विजय महिंद्रकर ,गणेश दंतकाळे सुशील महिंद्रकर यांनी मेहनत घेतली
सूत्र संचालन सुधीर क्षीरसागर यांनी तर आभार रवी लाडे यांनी केले.