सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने व सामाजिक न्याय विभाग यांच्या सौजन्याने आयोजित लोककलांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यामध्ये महात्मा फुले ग्रामीण विकास संस्था, निंबोणी ता. मंगळवेढा या कलापथकाने बार्शी तालुक्यात उपळाई (ठोंगे) या गावात कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी उपसरपंच संदीप बोटे, माजी सरपंच विजय ठोंगे, ग्रामपंचायत सदस्य संजय भोसले, ग्रामविकास अधिकारी मुकूंद जगदाळे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय भवानी कला पथक सांस्कृतिक मंडळ जवळा शाहीर सुभाष गोरे आणि कलापथकाने पंढरपूर तालुक्यात नातेपुते, माळशिरस तालुक्यातील माळीनगर, अकलूज, माळशिरस आणि नातेपुते या चार गावांत जनजागृती कार्यक्रम सादर केले. तसेच, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, पंढरपूर शहरातील भीम नगर, रामबाग आणि रमाई नगर या चार ठिकाणी जनजागृती कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला. सुंदर कलापथक मोडनिंब येथे कार्यक्रम सादर केला.
या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.