पंढरपूर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या खेलो इंडिया या क्रीडा प्रकारांमध्ये तिसर्या खेलो इंडिया हिवाळी सामन्यांचे आयोजन काश्मीरमधील गुलमर्ग येथे करण्यात आले होते. वजा 10 अंश सेल्सिअस तापमानामध्ये झालेल्या आईस हॉकी या क्रीडा प्रकारात तुंगत येथील श्रीनाथ स्केटिंग क्लासेसचे सूहर्ष शर्मा व श्रेया क्षीरसागर या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
मुलांच्या सतरा वर्षीय संघामधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सूहर्ष शर्मा याला कांस्यपदक तर श्रेया क्षीरसागर हिने मुलींच्या खुल्या गटातून महाराष्ट्राच्या संघाने सिल्वर मेडल संपादित केले आहे. याकरिता श्रीनाथ स्केटिंग क्लासेसचे मुख्य शिक्षक संतोष शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे सरपंच डाॅ.सौ.अमृता रणदिवे, उपसरपंच प्रकाश रणदिवे, ग्रा.पं.सदस्य डाॅ.पंकज लामकाने, राजु भोसले, ग्रामस्थ व आदींनी अभिनंदन केले आहे.