पंढरपूर प्रतिनिधी
दिनांक ११ व १२फेब्रुवारी २०२३ रोजी हे हस्त समुद्री व वास्तुविज्ञान अधिवेशन पार पडले. अखिल भारतीय स्तरावरचे हे संमेलन पंढरपूरच्या ज्योतिषाचार्य रेखा किशोरी टाक यांनी आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद उद्योजक शैलेंद्र बजाज यांना देण्यात आले होते.
आज पर्यंत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यामुळे या शास्त्राची प्रतिमा मलिन होत आली आहे. गैरसमज निर्माण झालेले आहेत.ते गैरसमज दूर होण्यासाठी या अधिवेशनांमधून जे व्याख्यान झाले त्या व्याख्यानाच्या माध्यमातून या शास्त्राविषयी गैरसमज दूर होण्याची प्रचिती आली.
या कार्यक्रमास देशभरातून व महाराष्ट्र राज्यातून असंख्य लोक हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले होते या कार्यक्रमास साधारण 150 अभ्यासक सामील झाले होते. ही व्याख्यानासाठी आलेले रसिक प्रेक्षक पंढरीनाथाच्या दर्शनाने कृत कृत झाले होते त्याचबरोबर ज्योतिष्य ज्योतिष्य विषयक हस्तसामुद्रिक विषय तसेच रत्ने याबाबतचे विविध मान्यवरांची व्याख्याने ऐकून प्रेक्षक वर्ग भारावून गेला होता त्यांच्या मनातील शंका कुशंकाचे निरसन झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी ज्या अभ्यासकांनी अविरत आपले जीवन हस्तरेषा व वास्तुशास्त्र या कार्यामध्ये आपली जीवन अर्पित केले आहे अशा अभ्यासकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पंढरपुरातील भक्तिमय आकर्षण म्हणजे टाळ वीणा आणि पंढरीनाथाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये श्री ब्रह्मा दत्त शर्मा लुधियाना यांना श्री राजराजेश्वरी पितामह सन्मान, तसेच रोहित जी वर्मा उज्जैन यांना श्री राजराजेश्वरी कर्मयोगी सन्मान, उपेंद्र भधोरियाजी अहमदाबाद यांना राजे राजेश्वरी विद्यावाचस्पती सन्मान, भारती जी चौधरी यांना राज राजेश्वरी तेजस्विनी, दामोदर बंसल जी जयपुर यांना राजेश्वरी पारस शिरोमणी सन्मान, मोहन दाते सोलापूर यांना राज राजेश्वरी भास्कर सन्मान, गुरु श्री प्रिया मालवणकर मुंबई यांना राज राजेश्वरी ब्रह्मा गुप्ता सन्मान व श्री शैलेश बजाज यांना कार्य गौरव सन्मान मिनू श्री शर्मा फरीदाबाद यांना गणेश श्री उपाधी, गौरी केंजाळे पुणे यांना निम्र क्वीन उपाधी, तसेच ज्योतिषशास्त्र शास्त्रातील अभ्यासक बळीराजाची भारतभोई दवे सचिन बेहेरे मिनू श्री कार्तिकी काका दुर्गेश गुप्ता रमेश गुरु वैशाली अत्रे चारुशीला मॅडम स्वप्नाचा डॉक्टर जगदीश कुमार डॉक्टर योगेश कुमार परमानंद शास्त्री डॉक्टर राजेंद्र कुमार दिल्ली वाले सचिन दुबे चक्राचार्य या सर्वांना ज्योतिष्यशास्त्रामधील विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेषता जगदीश टाक ,आदित्य टाक पंढरपूर येथील पामिस्सिट सेंटर चे सगळे विद्यार्थी विश्व हिंदू परिषद परिवार महेश भिवरे राजस्थानी मंडळ चे सदस्य या सर्वांनी परिश्रम घेतले वृत्तसंचालन मिनू शर्मा ,भारती चौधरी यांनी केले आभार विद्या रेपाळ यांनी मानले.