सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एस.व्ही.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहशिक्षक प्रविण कुंभार यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बार्शी तालुक्यातील खांडवी येथे आयोजित जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात गटशिक्षणाधिकारी राजकुमार तांबे यांच्या हस्ते प्रविण कुंभार यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा गाईड संघटक अनुसया सिरसाठ, प्रशालेचे पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रविण कुंभार हे २०११पासून स्काऊट गाईड चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.बेसीक, प्राथमिक, हिमालय वुड प्रशिक्षित असून २७ विद्यार्थ्यांना राज्यपाल पदक पुरस्कार मिळण्यासाठी मार्गदर्शन केले. श्रीपूर, होटगी, बोरामणी, वैराग,बोराळ,पाकणी,धोत्री आदी ठिकाणी पार पाडलेल्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात क्रियाशील सहभाग घेतला होता तसेच अहमदनगर व बेंगळुरू येथील राष्ट्रीय मेळाव्यात तर कर्नाटकातील मुडबिद्री येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील जांबोरी मेळाव्यात विद्यार्थ्यासह सहभागी झाले होते. स्काऊट गाईड चळवळीत सहभाग घेऊन प्रचार व प्रसार केल्यामुळे जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयांनी दखल घेतली व आज जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.