भाळवणी प्रतिनिधी
समाज कार्यासाठी आपले आयुष्य् आर्पण केलेल्या महान व्यक्तींची पुण्यतिथी साजरी केली जाते. दादांनी केलेल्या समाजकार्यामुळे त्यांचे पुण्य्तिथी निमित्त् विविध धर्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे पुत्र कल्याणराव काळे करीत असल्याचे भागवताचार्य ह.भ.प.रुपालीताई सवणे-परतुरकर महाराज यांनी सांगितले. सहकार शिरोमणी वसंतरावदादा काळे यांच्या 21 व्या पुण्य्तिथी निमित्त् सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्याची सांगता भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे-परतूरकर यांच्या काल्याचे किर्तनाने करण्यात आली.
ह.भ.प.रुपालीताई सवणे-परतुरकर यांनी काल्याचे किर्तनाचे महत्व सांगताना कृष्ण् चरित्राचे विचार घ्यावे व रामचरित्र आचरणात आणावे, दहिभाताच्या काल्याप्रमाणे संसार करत-करत परमात्म साधावा. आई वडिलांची सेवा करा असे सांगुन, गोपालकृष्णाच्या बाललिलांचे दाखले दिले. जगदगुरु तुकाराम महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची विचारांची शिकवण आचरणात आणवी असेही सांगितले..
प्रारंभी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे मा.संचालक दशरथ खळगे, उत्तमकाका नाईकनवरे यांच्या शुभहस्ते स्व.वसंतदादा काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्रअर्पण करुन पुजन करण्यात आले. चेअरमन कल्याणराव काळे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.संगिताताई काळे या उभयतांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी संचालिका श्रीमती. मालनबाई काळे, श्रीमती.सुमनबाई काळे उपस्थित होत्या. तदनंतर सर्व भाविक भक्तांना काल्याचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
स्व्.दादांच्या पुण्यतिथीनिमित्त् आयोजित केलेल्या अखंड हरिनाम गाथा पारायण व किर्तन सोहळ्यामध्ये प्रसिध्द् किर्तनकार ह.भ.प. भागवत महाराज बागल-गादेगांव, ह.भ.प.तुकाराम महाराज मस्के-भोसे, ह.भ.प.दादा महाराज कापसे-सांगवी, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कौलगे-पि.कुरोली, ह.भ.प. तात्या महाराज चौगुले-भाळवणी, ह.भ.प. धनाजी महाराज गुरव, धोंडेवाडी, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे-पळशी यांनी आपल्या सुश्राव्य् वाणीने सर्व श्रोते भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करत संत संगती करा, आपला धर्म- संस्कृती जपा, निस्वार्थी सेवा करा, सतकर्म करा, सामाजीक बांधिलिकी, माणुसकी जपा असा उपदेश दिला. सदर सप्ताहात किर्तनसास साथ देणारे श्रीराम भजनी मंडळ-उपरी, शेळवे, गादेगांव, देवडे, खेडभोसे, नांदोरे, सोनके, उपरी, जैनवाडी, सुपली, पि.कुरोली, वाडीकुरोली, वाखरी, भाळवणी, शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, भंडीशेगांव, वाघाडवस्ती, पळशी, सुपली, गार्डी, कौठाळी, खेडभाळवणी, वाडीकुरोली, पटकुरोली समस्थ भजनी मंडळांना सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. गाथा पारायण सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी भारत कोळेकर, नारायण शिंदे, धनाजी महाराज गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर दिवशी कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांचे शुभहस्ते करण्यात आले. शिबीरामध्ये 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर यांच्या सर्व डॉक्ट्रर व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे वेळी वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.भागवत चवरे महाराज, यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमर, माजी चेअरमन महादेव देठे, मा.पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, भिमा कारखान्याचे संचालक बिभिषण वाघ, जयसिंह देशमुख, निशिंगंधा बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्क श्रीविठ्ठल कारखान्याचे मा.संचालक रायाप्पा हळणावर, सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक सर्वश्री बाळासाहेब कौलगे, बिभिषनदाजी पवार, मोहन नागटिळक, भारत कोळेकर, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, राजाराम पाटील, दिनकर कदम, सुधाकर कवडे, इब्राहिम मुजावर, योगेश ताड, युवराज दगडे, नागेशदादा फाटे विलास जगदाळे, अरुण बागल, मा.संचालक राजाभाऊ माने, तानाजी जाधव, भारत गाजरे, पांडुरंग कौलगे, भारत भुसे, महादेव आण्णा देठे, विविध संस्थांचे पदाधिकारी व कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी भाविक भक्त् उपस्थित होते.