भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ज्ञानेश्वर चौगुले यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. त्यांची असिस्टंट इंजिनियर म्हणून विद्युत पारेषण मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी भगवानराव चौगुले, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी,विठ्ठल चौगुले,अर्जुन लिंगे, रणजीत जाधव, नितीन शिंदे, पोपट इंगोले,अनिल चौगुले,संभाजी चौगुले,ग्रामविकास अधिकारी वाघमारे,नीलकंठ चौगुले,नामदेव चौगुले,गणेश गवळी,राहुल चौगुले व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी चौगुले म्हणाले ,की माझे प्राथमिक शिक्षण चौगुलेवाडीत, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मध्ये तर पदवीचे शिक्षण सांगोला फॅबटेक येथे पूर्ण झाले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट केली पाहिजे आणि आपल्याला स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे आई वडील गुरुजनांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे तरच जीवनात कोणत्याही परीक्षेत यशस्वी सहज होऊ शकतो.