पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख गटप्रमुख विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख , संलग्न सर्व संघटना व त्यांचे पदधिकारी व शेतकरी यांच्या वतीने उद्या सोमवार दि ६\०२\२०२३ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कडून सुरू असलेल्या शेतीपंपाच्या विजतोडणी बाबत पंढरपूर तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांच्या उपस्थित निवेदन देणार आहे.
तरी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालूका यांच्या वतीने करण्यात आले आहे.