भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग चे संचालक भगवान चौगुले व सरपंच राजकुमार पाटील होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, सिताराम माने ,भीमराव जाधव,धोंडीराम शिंदे, नाना कौलगे, राजश्री ताड,सतीश शिंदे,प्राचार्य एन एम गायकवाड, पर्यवेक्षक एचडी रोकडे ,उप मुख्याध्यापक ए एस.पिसे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की,सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता यादीमध्ये या महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक लागतो या महाविद्यालयात प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी यांच्या समन्वयातून शैक्षणिक प्रकल्प राबवले जात आहेत त्यामुळे शाळेची प्रगती होताना दिसून येत आहे शाळेत कोणत्याही बाबतीत राजकारण आणले जात नाही त्यामुळे शाळेची प्रगती होताना दिसून येत आहे.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास तीन पंखे सप्रेम भेट दिले. तसेच शैक्षणिक वर्षात यशस्वी झालेल्या नव्वद विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व बक्षीस देण्यात आले.
तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल डी एल गोंजारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक मंडळ सदस्य पदी निवड झाल्या बद्दल प्रशांत कोळसे व आदर्श विद्यालय म्हणून पुरस्कार मिळाल्या बद्दल प्राचार्य गायकवाड यांचा मान्यवर मंडळीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन अनुश्री लंगोटे व समृध्दी धोत्रे यांनी केले.
यावेळी जरे यांनी प्रास्ताविक केले.तर आभार संजय शिंदे यांनी मानले.