भाळवणी प्रतिनिधी
पै.संतोष जगताप आणि माऊली कोकाटे यांच्यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर ‘ वसंत केसरी ’ किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये पै.माऊली कोकाटेने घुटना डावावर चित करुन ‘ वसंत केसरी चषक ’ पटकावला सांगोला विधान सभा मतदार संघाचे आमदार ॲङ शहाजीबापू पाटील व कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या हस्ते पै.माऊली कोकाटे यांना 2.51 लाख रोख, प्रशस्ती पत्र व वसंत केसरी चषक देवुन गौरविण्यात आले.
कारखान्याचे संस्थापक स्व्.वसंतरावदादा काळे यांच्या 21 व्या पुण्य्तिथीनिमित्त् कारखाना कार्यस्थळावर लाल मातीतील जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आखाड्याचे पुजन कारखान्याचे संचालक बिभिषन पवार, भैरवनाथ शुगर्स लि चे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगेसर यांचेहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत लहान गटातील 100 रुपयापासून ते इनामी 2.51 लाख पर्यत अनेक नामवंत मल्लांनी भाग घेवुन, सुमारे 350 चमकदार कुस्त्या करुन उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. वसंतराव काळे चषकासाठी कुर्डूवाडीच्या शिवराय व्यायाम शाळेचा माऊली कोकाटे आणि शिवनेरी तालीम अकलुज येथील नामदेव वाघमारे यांचा पट्टा संतोष जगताप या तोडीस-तोड व जोडीस-जोड असलेल्या मल्लांमध्ये आमदार ॲङ शहाजीबापू पाटील व कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याहस्ते कुस्ती लावण्यात आली. खडाखडी, डाव प्रतीडाव करत अवघ्या काही मिनीटात कोकाटेने पै.जगतापला आस्मान दाखवले. तर व्दितीय इनामी कुस्तीमध्ये गंगावेस तालीम कोल्हापूर येथील पै.सतपाल नागटिळक याने दिल्लीचा पैलवान खान यास चितपट करुन वसंत केसरी चषक पटकावला. कुस्ती मैदान यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी स्पर्धेचे संयोजक मोहन नागटिळक, दिनकर कदम, बिभिषन पवार, शिवाजी मदने, लक्ष्मण रोंगे, भारत भुसे, महादेव देठे, तुषार चव्हाण, सादिक मुलाणी, सोमनाथ सुर्वे, बापु जगताप, मारुती माळी, रामचंद्र देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
लाल मातीतील या कुस्ती मैदानात प्रथम लहान गटातील पै.सुर्या अभंगराव विरुध्द् पै.निखील माने याच्या कुस्तीने सुरुवात करण्यात आली. सदर कुस्ती मैदानात घिस्सा, भारंदाज, कलाजंग, धोबीपछाड, साल्तो, बॅकथ्रो या कुस्ती कलेतील अनेक डाव प्रतिडावाने सहकार शिरोमणी कारखान्यावरील कुस्ती मैदान प्रेक्षणीय व लक्षवेधक ठरले. हालगी व घुमक्याचा ठेक्याने आणि वस्ताद धनाजी मदने यांच्या कुस्तीच्या धावत्या समालोचनाने उपस्थित कुस्ती शौकीनांमध्ये नवचैतन्य् निर्माण केले. उपस्थित मान्यवरांनी समालोचनाचे कौतुक करुन धनाजी मदने यांना रोख रक्कमेचे बक्षिस दिले. सदर कुस्ती मैदानात महिलापट्टुनेही सहभाग घेतला.
सर्व विजेत्या मल्लांना श्रीविठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, भैरवनाथ शुगर्स लि चे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत, धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव काळुंगेसर, स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य-सचिव बब्रुवाहन रोंगे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुधाकर कवडे, मनसेचे प्रदेश सचिव दिलीप धोत्रे, निशिगंधा बँकेचे मा.व्हा.चेअरमन विलास साळुंखे, व्हा.चेअरमन आर.बी.जाधव, विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, यशवतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हणमंत मोरे, विरोधीपक्षनेते नगर पालिका पंढरपूर सुधिर धोत्रे, माजी नगरसेवक सुधिर धुमाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अमर सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेश भादुले यांचे हस्ते रोख रक्कम व प्रशस्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
कुस्तीस्पर्धेस पंच म्हणुन छोटा रावसाहेब मगर, भारत माळी, सोमनाथ सुर्वे, सोमनाथ नागटिळक, शरद पवार, नारायण शिंदे, यांनी काम पाहिले. आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे हस्ते व प्रमुख उपस्थितीत असलेल्या मान्यवरांचा सत्कार कारखान्याचे संचालकांनी केला.
यावेळी वस्ताद पै.रावसाहेब मगर, सोमनाथ मरगर, बापुसाहेब कोकाटे, अनिल नागटिळक, यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमर, माजी चेअरमन महादेव मल्लिकार्जुन देठे, व्हा.चेअरमन सादिक मुलाणी, गोरख निर्मळ, मा.पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, भिमा कारखान्याचे संचालक बिभिषण वाघ, विठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, जयसिंह देशमुख, डॉ.सुधिर शिनगारे, भाळवणीचे सरपंच सुनिल पाटील मा.सरपंच दिलीप भानवसे, उपसरपंच दाऊद शेख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री.राजेंद्र शिंदे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, बिभिषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फाटे तसेच श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी कारखान्याचे आजी माजी संचालक उपस्थित होते.