पंढरपूर प्रतिनीधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी एआयसीटीई च्या माध्यमातून मिशन अमरित सरोवर जलधर संरक्षणच्या इंटरंशिप अंतर्गत "सोलापूर ओल्ड फोर्ट" सोलापूर येथील किल्ल्याचा अभ्यास करून शेवटच्या वर्षातील अभियंत्यांनी यशस्वी रित्या इंटरंशिप पूर्ण केल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
महाविद्यालयाच्या वतीने कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तेथील बांधकामाच्या स्वरूपाची माहिती घेतली.
इंटरंशिप याबद्दल महत्वपूर्ण माहिती शेवटच्या वर्षातील अभियंत्यांना यादरम्यान मिळाली. आधुनिक यंञ व साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपस्थित अभियंत्याकडून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण इंटरंशिप यशस्वी रित्या पूर्ण करून किल्ल्यावर जल व किल्ला संवर्धनाचे माहितीचे फलक लावून सामाजिक वारसा जपला.
महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंटरंशिप पूर्ण करण्यासाठी प्रा. यशवंत पवार प्रा. शेखर पाटील सह सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.