पंढरपूर प्रतिनिधी
" जागरूक पालक सुदृढ बालक योजनेअंतर्गत" महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव यांच्या नेतृत्वाखाली एम आय टी कॉलेज वाखरी येथे दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
यामध्ये विद्यार्थ्यांच्या जन्मजात दोष, जन्मजात आजार, कमतरता, विकासात्मक विलंब अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. तांबोळी, डॉ. अभिजित रेपाळ, डॉ. विवेकानंद घोडके, डॉ. अमोल जाधव, डॉ. सुनीता हाके, डॉ. पांडुरंग माने तसेच आरोग्य सहाय्यक श्री मुलाणी, आरोग्य सेवक मस्के, कसबे, शिंदे, श्रीमती काळे, श्रीमती माळी, श्रीमती भोसले यांच्या टीमने आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
एम आय टी कॉलेजचे सीनिअर प्रिन्सिपल श्री अपू डे, जुनियर कॉलेज च्या प्रिन्सिपल कार्तिश्वरी मॅडम, स्कूल चे प्रिन्सिपल शिवाजी गवळी सर यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.