पंढरपूर प्रतिनिधी
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये रविवार, दि.२९ जानेवारी २०२३ रोजी छोट्या गटापासून ते पदव्युत्तर पदवी मधील विद्यार्थ्यांसाठी एकूण ६ गटांमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ‘रंगसंवाद-२०२३’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून या स्पर्धेचा निकाल चित्रकलेतील अनुभवी चित्रकारांकडून परीक्षण करून काढण्यात आले. या स्पर्धेच्या सर्व गटांतील विजेत्यांना शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे प्रा. डॉ.राजकुमार कदम व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व रोख पारीतोषिके देण्यात आली.
स्वेरीमध्ये आयोजिलेल्या ‘रंगसंवाद-२०२३’ या चित्रकला स्पर्धेत पंढरपूर व तालुक्यातील जवळपास सर्व शाळा, महाविद्यालयांमधून ६ गटात एकूण ११६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे समन्वयक प्रा.यशपाल खेडकर यांनी ‘रंगसंवाद-२०२३’ स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. या स्पर्धेच्या प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले असून प्रत्येक गटातून स्वतंत्र बक्षिसेही वितरीत करण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी रोख रु. दिड हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रोख रु.एक हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रु. पाचशे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन स्पर्धक याप्रमाणे विजेते ठरलेले गुणवंत स्पर्धक पुढीलप्रमाणे- बालगट (छोटा व मोठा शिशु) -श्रीशा ज्ञानेश सुरवसे, सायली शानू उळागड्डी, शिवन्या सचिन डुबल, वेदिका आशुतोष गरड व सिद्धांत प्रणव चोपडे, प्राथमिक गट (इयत्ता-पहिली ते चौथी) -स्वराली सुजित इनामदार, अथर्व विनोद कुंभार, त्रिशा दिपक सुडके, हिरण्यतेजा प्रणव चोपडे व मृण्मयी राजेश ठाकरे, किशोर गट (इयत्ता-पाचवी ते सातवी) -अथर्व अमित वाडेकर, स्पर्श प्रवीण ढवळे, प्रणिती अजित पवार, आकांक्षा अविनाश वेळापुरे व वेदश्री प्रसाद संत, कुमार गट (इयत्ता नववी व दहावी) - अथर्व अतुल जगदाळे, गौरी शशिकांत साखरे, गौरी संतोष थिटे, कृष्णा शशिकांत कवडे व आर्या अजित माने, युवा गट (इयत्ता -अकरावी, बारावी व डिप्लोमा)- ओंकार राजेंद्र शिंदे, सुजित सुनील दास, सानिया राजू मुजावर, सृष्टी सुधीर नारायण व साक्षी चंद्रकांत पवार, युवा गट (उच्च महाविद्यालयीन गट पदवी)- वेदिका संजय नलवडे, श्रेया शरद जगताप, पूजा मोहन कापरे, कोमल महादेव कोकरे व अनिशा अजय भालेराव या विजेत्यांना पुरस्कार देवून गोरविण्यात आले.
यावेळी कोर्टीच्या नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद संत, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव, विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.