पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रभाकर इंगळे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी दाजी पाटील,पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, पांडुरंग कारखान्याचे मा. चेअरमन दिनकर भाऊ मोरे, ह.भ.प. उखळीकर महाराज, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य नाना गोसावी यांच्यासह बहुसंख्य भाविक भक्त उपस्थित होते. अमृत महोत्सवानिमित्त प्रभाकर इंगळे यांच्यावर तालुक्यातील मान्यवरांनी शुभेच्छा चा वर्षाव केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप इंगळे व इंगळे परिवाराने परिश्रम घेतले.